Ganapati Bappa Morya!

Permanent Link | Filed under: Greetings,Life
16
Sep
2005

Can’t read this? Or seeing misspellings?, Photos: Sthapana, Visarjan

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!

आम्ही ह्या वेळी काळेवाडी मध्ये एकदम मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला। संपूर्ण दहा िदवस, दररोज रात्री आरत्या म्हणत, प्रसाद खात, धमाल केली। टिळकांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव आणला; आम्ही तोच सण परदेशात नेला। फरक एवढाच, टिळकांनी राष्ट्रासाठी व आम्ही आपापल्या घरच्या आठवणींमुळे!

मुंबईत शोधून सापडणार नाहीत इतके हौशी लोकं इकडे असताना पूजेचं सामान, मोदक, प्रसाद, इ. इकडे सहसा मिळत नसल्याचा भास देखील झाला नाही। जे जे पाहिजे होतं ते ते कोणी ना कोणी मिळवलं। अगदी सुपारी पर्य॑त!

दररोज रात्री किमान २५ लोकं असतात आरतीला। मग प्रसाद आणि खूप गप्पा। वास्तविक सगळे जणं एकमेकाला दररोज िदवसा युनिव्हरसिटीत भेटतात, तरी आरतीनंतर कमीतकमी एक-दोन तास कोणीही निघायचं नाव घेत नाही। एकूण वातावरण पाहून वाटतच नाही की आपण महाराष्ट्रापासून सुमारे दहा हजार माईल दूर आलेलो आहोत।

लोकमान्य असते तर बघून खूष झाले असते।

1 Comment »

  1. nice!!
    wachun masta watla…except i didnt see the photos….:(

    Comment by Supriya — September 27, 2005 @ 3:22 pm

RSS feed for comments on this post. TrackBack URI

Leave a comment

Bookmark and share using ...

Delicious Facebook Digg Google Friendfeed Stumbleupon Twitter Linked In